अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अनेक अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांची झाडाझडती सुरू केली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते आणि यशराज फिल्म्सचे सर्वेससर्वा आदित्य चोप्रा यांची काल पोलिसांनी चार तास कसून चौकशी केली होती. यावेळी त्यांच्यावर पोलिसांकडून असंख्य प्रश्नांचा (Actor Sushant Singh Rajput suicide case) भडिमार करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. असं असलं तरी चौप्रा यांच्या चौकशीनंतर मुंबई पोलिसांसमोरील पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. आदित्य चोप्रा आणि संजय लीला भन्साळी यांनी नोंदवलेल्या जबाबांमध्ये मोठी तफावत असल्यानं संभ्रम वाढला आहे.

वांद्रे पोलिसांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात जाऊन आदित्य चोप्रा यांची कसून चौकशी केली. चोप्रा यांचा बंगला वर्सोवा पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असल्यानं वर्सोवा येथेच ही चौकशी करण्यात आली होती. यशराज फिल्म्सनं सुशांतबरोबर केलेले कॉन्ट्रॅक्ट आणि सुशांतला देण्यात आलेल्या चित्रपटांच्या ऑफर्सबाबत पोलिसांकडून चोप्रा यांना प्रश्न विचारण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सुशांतचे यशराज फिल्म्ससोबत करार असल्याकारणानं त्याला संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट करता आले नाहीत असं, भन्साळी(Actor Sushant Singh Rajput suicide case) यांनी त्यांच्या जबाबात म्हटलं आहे. परंतु असं काही झालं नसल्याचं आदित्य चोप्रा यांचं म्हणणं आहे. संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी सुशांतला घेण्यासाठी भन्साळी यांनी यशराज फिल्म्ससोबत चर्चा केल्याचंही भन्साळी म्हणाले होते. पंरतु अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचं चोप्रा यांनी म्हटलं आहे. सुशांत यशराजच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असताना सुशांतनं एमएस धोनी या चित्रपटात काम केलं होतं. मग त्याला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करता आलं नसतं का, असा प्रश्नही चोप्रा यांनी उपस्थित करत यशराज आणि सुशांत यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं सांगितलं आहे.

तसंच रामलीला चित्रपटासाठीही भन्साळी यांनी सुशांतलाच पहिली पसंती दर्शवली होती. परंतु यशराज फिल्म्सकडून त्याला परवानगी देण्यात आली नाही. हा आरोपही आदित्य चोप्रा यांनी फेटाळला आहे. रणवीर सिंहनं २०१२मध्ये फेब्रुवारी(Actor Sushant Singh Rajput suicide case) महिन्यात रामलीला चित्रपटासाठी कॉन्ट्रॅक्ट साइन केलं होतं. तर सुशांतचं यशराज फिल्म्ससोबत कॉन्ट्रॅक्ट हे २०१२च्या नोव्हेंबरपासून होतं असं आदित्य चोप्रा यांनी म्हटलं आहे.

आदित्य चोप्रा आणि संजय लीला भन्साळी यांच्या जबाबामुळं या प्रकरणातील पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्यावर उपचार करणाऱ्या दोन मनोविकार तज्ज्ञांचीही चौकशी केली होती. सुशांत नेमकी कोणती औषधे घेत होता, त्याचा इलाज कसा सुरू होता, याची माहिती (Actor Sushant Singh Rajput suicide case)घेण्यासाठी पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांची कबुली जबाब नोंदवून घेतले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात ३७ लोकांची कसून चौकशी केली आहे. पोलीस अजूनही काही लोकांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे