८३ वर्षे मोफत नेटफ्लिक्स… जाणून घ्या भन्नाट ऑफरनेटफ्लिक्स (Netflix Free Subscription), अॅमॅझॉन प्राईम (Amazon Prime)आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म्स आजकाल सर्वांच्याच पसंतीस उतरत आहेत. ग्राहकांनाही आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या कंपन्यांकडून निरनिराळ्या ऑफर्स देण्यात येत असतात. परंतु सध्या नेटफ्लिक्सनं एक भन्नाट ऑफर सुरू केली आहे. ती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. एक-दोन-तीन नाही तर तब्बल ८३ वर्षे किंवा १ हजार महिने मोफत नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन देण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली (play game the old guard Free netflix subscription) आहे

परंतु कंपनीनं यासाठी एक अट घातली आहे. ही अट अशीतशी नाही तर हे सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी तुम्हाला एक गेम खेळावा लागणार आहे. या गेमचं नाव आहे ‘द ओल्ड गार्ड’. या गेममध्ये तुम्हाला टॉप स्कोअरर बनावं लागणार आहे. नेटफ्लिक्सनं नुकताच एक चित्रपच प्रदर्शित केला होता. या चित्रपटात चार्लिज थेरॉन यांनी भूमिका साकारली होती. सध्या नेटफ्लिक्सनं न्यू नेटफ्लिक्स (Netflix Free Subscription) ओरिजनल स्ट्रीमिंग सर्व्हिससाठी इम्मॉर्टल नेटफ्लिक्स अकाऊंट लाँच केला आहे. याअंतर्गत युझर्सना ८३ वर्षांसाठी नेटफ्लिक्सचं सबस्क्रीप्शन देण्यात येतं.
ऑल्ड गार्ड गेम हा ब्राऊसरवर आधारित एक गेम आहे. https://www.oldguardgame.com/ या वेबसाईटवर हा गेम खेळता येणार आहे. सध्या नेटफ्लिक्स इम्मॉर्टल गेम अॅक्टिव्ह आहे. १९ जुलैपर्यंत ही ऑफर सुरू राहणार असून (play game the old guard Free netflix subscription)या गेमदरम्यान सर्वाधिक स्कोअर करणाऱ्या युझरला ८३ वर्षांसाठी हे सबस्क्रीप्शन मिळणार आहे. परंतु सध्या केवळ अमेरिकेतील नेटफ्लिक्स युझर्ससाठी ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments