जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात सोमवार दि.20 जुलैला लॉकडाऊन घोषीत केला गेला आहे. या काळात इतर जिल्ह्यातून कोल्हापुरात प्रवेश करणारे व्यक्ती व वाहने यांना दिले जाणारे ई - पास स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.   
पुढील दोन आठवड्यांसाठी दैनंदिन किंवा इतर स्वरुपातील प्रवासाचे ई - पास किंवा इतर परवानग्या आज पासून स्थगित करण्यात येत आहे.

यांना मिळेल सुट
केवळ वैद्यकीय तातडीची खात्री झाल्यास व सदर व्यक्ती कोल्हापूर क्षेत्रातील (आधारकार्ड पत्यानुसार) असेल तरच परवानगी देण्यात येईल. तसेच मालवाहतूक व अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा देत असलेल्या व्यक्तींना व वाहनांना सुट असेल.