या भेटीत साखर व्यवसायाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यात बफरस्टॉकची मुदत जुलै २०२० असून ती वाढवणे, साखरेचे एक्सपोर्ट धोरण ठरवणे, एक्सपोर्ट अनुदान व बफर स्टाॅकचे व्याज कारखान्याना तात्काळ देणे, कारखान्यांना तोटा भरून काढण्यासाठी (Hasan Mushrif taunts Devendra Fadnavis)प्रतिटन ६०० रुपये अनुदान देणे, इथेनॉलचे दीर्घकालीन धोरण ठरवून आर्थिक मदत करणे व कारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
फडणवीसांच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी फडणवीसांना टोला हाणला आहे. 'साखर व्यवसायावर लाखो ऊस उत्पादक, लाखो कामगार, शेतकऱ्यांसह देशाचे, राज्याचे अर्थकारण व लाखो कुटुंबे अवलंबून आहेत. त्यामुळंच गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार शेतकऱ्यांच्या ऊसासह इतर सर्वच पिकासाठी मेहनत घेत आहेत. या वयातही त्यांचे हे काम सुरू आहे. फडणवीसांना आता याची जाणीव निश्चितच झाली असेल,' असं मुश्रीफ म्हणाले

0 Comments