जिल्ह्यात उद्यापासून पासून सात दिवस १०० टक्के लॉकडाऊन (100% lockdown)जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामीण भागातील उद्योग आस्थापना मध्ये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.
त्या बरोबर दूध संकलन व वाहतुकीसाठी वेळेची मर्यादा असणार नाही. या बाबतचा सुधारित आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई (Daulat Desai) यांनी आज दिला आहे